जागतिक वन दिवसाचे आवचित्त साधून कराड स्वच्छग्रह टीम व कराड नगरपरिषद, कराड यांच्या मार्फत आज कराड येथील टाऊन हॉल ह्या ठिकाणी महाराष्ट्र वनविभागाचे वरिष्ठ अधीकारी श्री. बाबुराव शिंदे साहेब व कराड नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती सौ. प्रियांका यादव यांच्या हस्ते ग्रीनी द ग्रेट हा कचरा वर्गीकरण विषयी गेम लॉन्च करण्यात आला….
  • ह्या गेम लॉन्च कार्यक्रमासाठी महाराष्ट्र वनविभागाचे श्री.बाबूराव शिंदे, श्री.जाधव व सर्व सहकारी, कराड नगरपरिषदचे आरोग्य सभापती सौ.प्रियांका यादव, आरोग्य निरीक्षक श्री.मिलिंद शिंदे, श्री.पवार, श्री.भालदार तसेच टाऊन हॉलचे सर्व सहकारी,
  • एनव्हायरो फ्रेंड्स नेचर क्लबचे श्री.जालिंदर काशिद, श्री.भांबुर्डे, श्री.भिसे, श्री.चंद्रकांत जाधव, श्री.आनंदराव थोरात व सर्व सहकारी,
  • ग्रीनी द ग्रेट टीम
  • तसेच विठामाता शाळा, कन्याशाळा व पालकर शाळा यांचे सर्व शिक्षक-शिक्षिका व सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी (300+) उपस्थित होते. उपस्थित
  • असणाऱ्यांपैकी 60+ लोकांनी गेम डाऊनलोड करून तो खेळून पहिला.

गेम संदर्भात काही प्रतिक्रिया

  • कचरा व्यवस्थापनात हा गेम खूप मदत करेल सर्वानीच हा गेम नक्की खेळून पहा छान आहे हा गेम – आरोग्य सभापती सौ. प्रियांका यादव

  • कचरा वर्गीकरण प्रक्रियेत हा गेम म्हणजे कचरा व्यवस्थापनात क्रांतीच म्हणावी लागेल. – जेष्ठ नागरिक व स्वच्छता दूत श्री. चंद्रकांत जाधव

  • कचरा व्यवस्थापनात आशा प्रकारचा गेम मी पहिल्यांदाच बघतोय. टीमचे आभार – महाराष्ट्र वनविभागाचे अधिकारी श्री.बाबूराव शिंदे

  • मी कधीच गेम खेळलो नाही पण हा गेम खेळुशी वाटतो खूप इंटरेस्टिंग गेम आहे. – आरोग्य निरीक्षक श्री. मिलिंद शिंदे

  • ग्रीनी टीम ही कराड मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते त्यांच्या ह्या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो. – श्री. विजय वाटेगावकर

  • आता आम्हलाही लोकांना सांगता व दाखवता येईल की कचरा वर्गीकरण म्हणजे काय..? – SWM स्टाफ सुपरवायझर श्री. मारुती काठरे

  • खुप छान गेम आहे, हा गेम मीही खेळेल आणि माझा विद्यार्थ्यांना ही सांगेल. – इन्व्हायरो क्लबचे श्री. जालिंदर काशीद

  • मीही कचरा व्यवस्थापनात काम करतो परंतू ही गेमची कल्पना काही वेगळीच आहे. खुप सुंदर ग्रीनी टीम – ज्ञानदीप NGO चे श्री.आनंद थोरात