जागतिक वन दिवसाचे आवचित्त साधून कराड स्वच्छग्रह टीम व कराड नगरपरिषद, कराड यांच्या मार्फत आज कराड येथील टाऊन हॉल ह्या ठिकाणी महाराष्ट्र वनविभागाचे वरिष्ठ अधीकारी श्री. बाबुराव शिंदे साहेब व कराड नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती सौ. प्रियांका यादव यांच्या हस्ते ग्रीनी द ग्रेट हा कचरा वर्गीकरण विषयी गेम लॉन्च करण्यात आला.
- ह्या गेम लॉन्च कार्यक्रमासाठी महाराष्ट्र वनविभागाचे श्री.बाबूराव शिंदे, श्री.जाधव व सर्व सहकारी, कराड नगरपरिषदचे आरोग्य सभापती सौ.प्रियांका यादव, आरोग्य निरीक्षक श्री.मिलिंद शिंदे, श्री.पवार, श्री.भालदार तसेच टाऊन हॉलचे सर्व सहकारी,
- एनव्हायरो फ्रेंड्स नेचर क्लबचे श्री.जालिंदर काशिद, श्री.भांबुर्डे, श्री.भिसे, श्री.चंद्रकांत जाधव, श्री.आनंदराव थोरात व सर्व सहकारी,
- ग्रीनी द ग्रेट टीम
- तसेच विठामाता शाळा, कन्याशाळा व पालकर शाळा यांचे सर्व शिक्षक-शिक्षिका व सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी (300+) उपस्थित होते. उपस्थित
- असणाऱ्यांपैकी 60+ लोकांनी गेम डाऊनलोड करून तो खेळून पहिला.